UDYAM-MH-21-0084671

जिल्हा परिषद हायस्कूल करखेली येथे बालिका दिन उत्साहात साजरा धर्माबाद तालुका प्रतिनिधी सौ.मीना राजू भद्रे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत कु. पायल गलांडे, श्रुतिका जंगलेकर ,दुर्गा जंगलेकर ,धनश्री पिकले या मुलींनी “मी सावित्री बोलते” हे मनोगत व्यक्त केले.
कु. नागमणी गायकवाड, रोहिणी डोकळे ,नंदिनी खांडरे, तेजस्वी गायकवाड ,आंचल देसाई राजनंदनी राजफोडे, रोशनी आंबटवाड ,प्रितेश कटकावले,तनुश्री गायकवाड, आरोही यसलवाड, किरण सलगरे व उर्दू माध्यमाच्या शेख सनोबर, शेख असफिया या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
शाळेतील शिक्षक मोहन कावडे यांनी स्वरचित गीत गायले. याप्रसंगी वैजयंती देशपांडे, हनुमंत कांन गुलवार ,शिवकुमार पाटील व कांतराव लोखंडे या शिक्षकांनी आपले मनोगत मांडले.या सुंदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कु. समीक्षा कोकरे व दुर्गा जंगलेकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी मारुती बोंबले, संजय गैनवार ,संतोष खेडकर, मोहन कावडे यांनी सहकार्य केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई जिलेबी वाटप करण्यात आली.

Traffic Tail
Author: Traffic Tail

Leave a Comment