UDYAM-MH-21-0084671

मुदत संपलेल्या वाहनांचा वाळू मुरूम वाहतुकीसाठी वापर, आरटी ओ विभागाचे दुर्लक्ष.?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुदत संपलेल्या वाहनांचा वाळू ,मुरूम वाहतुकीसाठी वापर; आर टी ओ विभागाचे दुर्लक्ष….

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

धर्माबाद ( मुख्यसंपादक )

धर्माबाद तालुक्यात प्रशासन सातत्याने दंडात्मक कार्यवाही करून मुरूम वाळू वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी अनेक वाहने रात्री मुरूम वाळू वाहतूक करीत आहेत यातील काही वाहने तेलंगणा पासिंग ची असून काही वाहनांची सर्विस , फिटनेस संपले तरीही रोडवर धावत असल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असून या प्रकाराकडे आर टी ओ विभागाचे का दुर्लक्ष होत आहे हा मुख्य मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.

 रस्ते अपघात रोखण्यासाठी आर टी ओ विभागाने विशेष मोहीम राबवून जनजागृती केली पण रस्त्यावर धावणाऱ्या बिना नंबर ची वाहने, ओव्हरलोड वाहने, सर्विस आणि फिटनेस संपलेली वाहने यावर कार्यवाही करण्यासाठी का पुढाकार घेतला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.धर्माबाद येथे महिन्यातून दोन वेळा आर टी ओ विभागाचे सहायक वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पथक येते पण या पथकाने कधीही अवजड , ओव्हरलोड वाहने सर्विस आणि फिटनेस संपलेली वाहने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर कार्यवाही का केली नाही हे एक कोडे बनले आहे.

रात्रीच्या वेळी धावणाऱ्या टिपर, हायवा सुसाट वेगाने धावत आहेत काही वाहनांच्या नंबरप्लेट खोडविण्यात आले तर काही तेलंगणा पासिंग असलेल्या वाहनांची सर्विस आणि फिटनेस संपलेली असल्याचे जानकर नागरिक बोलून दाखवत आहेत.

आरटीओ विभागास शासनाने सुसज्ज वाहन व यंत्र सामुग्री उपलब्ध करुन दिले आहेत अपेक्षित कर्मचारी आणि अधिकारी पण आहेत तरी देखील ओव्हरलोड वाहने, सर्विस आणि फिटनेस संपलेली वाहने, नंबर प्लेट खोडविण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही तसेच भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे दुर्घटना किंवा जीवित हानी घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबद्दल वरिष्ठांनी तातडीने घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे

Leave a Comment