UDYAM-MH-21-0084671

धर्माबाद उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची मागणी अद्यापही प्रलंबीतच

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धर्माबाद उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची मागणी अद्यापही प्रलंबितच

धर्माबाद तालुका मुख्य संपादक

सौ.मीना राजू भद्रे

शहरात उपजिल्हा रुग्णालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे जी आजतागायत पूर्ण होऊ शकलेली नाही. पण शहरातील तेलंगाना राज्यांशी जोडणारे आद्ययावत झालेले रस्ते व होणारे अपघात या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी धर्माबादला ट्रामा केअर सेंटर सुरू करावे व ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे अशी मागणी धर्माबाद वासिंयाकडून होत आहे . सदरची मागणी अद्यापही प्रलंबित आहे.

नको त्या विकास कामाचे क्रेडिट घेण्याची राजकीय स्पर्धा लागते आणि दुसरीकडे अत्यावश्यक असलेल्या बाबीकडे दुर्लक्ष का करीत आहेत की त्यांच्या मागणीला सरकारं दरबारात प्रतिसाद मिळत नाही हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

धर्माबाद तालुक्यातून तेलंगणा राज्याला जोडणारे तीनही बाजूचे रस्ते आद्ययावत झाले आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी,बासर तीर्थक्षेत्र ते बिलोली कडे जाणारा रस्ता व कारेगाव फाट्याकडून बासर तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता हे सर्वच रस्ते अगदी अद्ययावत झाले असून वाहने सुसाट वेगाने जात आहेत. त्यामुळे वरचेवर अपघाताची शृंखलाच सुरू झाली असून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी ट्रामा सेंटरची अत्यंत गरज असते पण इथे ते नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

ट्रामा सेंटरमध्ये घायाळ झालेल्या रुग्णांना तात्काळ इलाज केला जातो. यामध्ये एक इमर्जन्सी वार्डही असतो आणि अपघातात विशेषतः डोक्याला मार लागण्याची व हाडे तुटण्याची सर्वात जास्त भीती असते. त्यामुळे मेंदू रोग तज्ञ व अस्थिरोग तज्ञ ट्रामा सेंटरला असतातच. त्याशिवाय

सदरील ड्रामा सेंटर मध्ये उच्चशिक्षित डॉक्टर, सर्जन, नर्स आदी कार्य तत्पर असतात. औषधी विभागही अद्ययावत असून ट्रामा सेंटर मधील औषधी विभागात सर्व प्रकारचे औषधी रुग्णांना मोफत मिळतात. ट्रामा सेंटरचे आद्ययावत असे फिरते वाहन असते. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ ट्रामा सेंटर मध्ये ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता असते.

धर्माबादला उपजिल्हा रुग्णालय नाहीतर नाही किमान ट्रामा सेंटर तरी व्हावे अशी मागणी संपूर्ण नागरिकांतून होत.

योगायोग राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि स्थानीक आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यामुळे हा विषय आता तरी मार्गी लागला पाहिजे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या अतीशय जिव्हाळ्याचा हा विषय असून यात लक्ष घालून आपल्यातील कार्यसम्राट पना लोकप्रतिनिधीनी कृतीत आणून दाखवणे गरजेचं बनले आहे.

राज्यात महायुती ची स्पष्ट बहुमताची सरकारं आहे आणि या मतदार संघातून निवडून आलेले आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यामुळें आता तरी हा प्रश्न सुटला पाहिजे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे

Leave a Comment