- प्रभारीराज मुळे धर्माबाद कृषी विभागाचा सावळा गोंधळ:अनेक योजना कागदावरच खर्च दाखवून अनुदानावर डल्ला!

धर्माबाद तालुका प्रतिनिधी सौ.मीना राजू भद्रे
धर्माबाद कृषी विभागासाठी जबाबदार अधिकारी मिळत नसल्याने बिलोली येथील अधिकाऱ्याकडे प्रभारी चार्ज सुपूर्द करण्यात आला असून त्यांच्या कालावधीत सावळा गोंधळ सुरु असून अनेक शासनाच्या योजना कागदावर दाखवून सरकारी अनुदानावर मात्र डल्ला मारल्या जात आहे. या अनागोंदी कारभार मुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा, औषधे, साहित्य, भाजीपाला बियाणं आणि फवारणी किट हे साहित्य कधिच शेतकऱ्यां पर्यंत पोहत नसल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांतून बोलले जत आहे.
उपलब्ध साहित्य शेतकऱ्यांना वाटप न केल्याप्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.सदरचे साहित्य शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले नाही तर कोणा मार्फत गायब करण्या आले याची जिल्हा कृषी अधीक्षक मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
तालुका कृषी कार्यालयात मागील काही महिन्यांपासून अधिकारी प्रभारी होते. ज्या अधिकाऱ्याकडे प्रभारी कारभार दिला ते अधिकारी कार्यालयात न येताच हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याचे बोलल्या जात आहे.
याच बाबीची संधी साधून काही कर्मचाऱ्यांनी साहित्याचे वाटप न करता, काळ्या बाजारात विक्री केल्याचे शेतकऱ्यांतुन बोलले जात आहे. हे साहित्य शेतकऱ्यांना न देता कोणा मार्फत काळ्या बाजारात विकलं आणि यास कोणाची मुक संमती होती याची चौकशी केल्यास शेतकऱ्यांच्या साहित्यावर डल्ला मारल्या जाणाऱ्यांची साखळी उजेडात येईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे
या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे .विविध योजनाअंतर्गत कृषी विभागाकडून शेतीच्या निविष्ठा पुरवल्या जातात
विविध योजनेअंतर्गत राज्य सरकारच कृषी विभाग शेतकऱ्यांना कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करुन देते. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवला जातो. महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांची शेतीविषयक कामं अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी आणि लागवड यंत्रे, पीक संरक्षण अवजारे, काढणी आणि मळणी अवजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करुन देणारी यंत्रे वितरीत केली जातात. राज्य सरकारच्या या योजनांमुळं गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होतो. पण अशा महत्वपूर्ण योजनांची सोईने वाट लावली जात असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते यासाठी आर्थिक तरतूद आहे मात्र ही शिबिरे केवळ कागदोपत्री दाखवून फोटो सेशन करून त्या पैशावर देखील डल्ला मारल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.
शासनाने प्रत्येक कार्यालयासाठी प्रशासकीय वेळापत्रक आणि वेळेवर उपस्थिती साठी बायो मॅट्रिक प्रणाली अमलात आणली तरी पण अनेक जण देवगिरी ने येणे जाणे करीत उरलेल्या वेळेत कर्तव्य पार पाडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.